भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागलें वरुष पांचवें बाळासी । खेळे तो मुलांसी नेटेंपाटें

lagalen varush panchaven balasi | khele to mulansi netempaten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लागलें वरुष पांचवें बाळासी । खेळे तो मुलांसी नेटेंपाटें ॥१॥ पाहाती ते लोक विस्मय पावती । त्याची अंगकांती कोण वाणी ॥२॥ चंद्रा ऐसें मुख पंकजलोचन । धैर्यासी मंडण तोचि एक ॥३॥ सांवळा सुकुमार उंद्धर गोजिरा । बुद्धीचा अंतरा बोधवीत ॥४॥ वीर्यधैर्य पाइक जयाचा । नामा म्हणे वाचा वर्णवेना ॥५॥