भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपावंत समर्थ म्हणूनि करी आर्त । येईन सांवरत पांडुरंगे

krupavant samartha mhanuni kari arta | yein sanvarat pandurange

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृपावंत समर्थ म्हणूनि करी आर्त । येईन सांवरत पांडुरंगे ॥१॥ मज कां विसंबली विठ्ठल माउली । तनु तृषावली जीवनेंविण ॥२॥ तूं माझें जीवन नाम जनार्दन । ह्रदयीं भरी पूर्ण प्रेमरस ॥३॥ अमृताच्या करेंज कांसवीच्या भरें । कुरवाळीं त्वरें देह माझा ॥४॥ पूर्ण पान्हा देई निववीं ह्रदयीं । येई वो कान्हाई सांवळिये ॥५॥ नामा म्हणे पावे जीवा शीण न साहे । वेगीं लवलाहे पाजी पान्हा ॥६॥