भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण होईल आत्मज्ञानी । जो बा राहे त्याच्या ध्यानीं

kon hoil atmadnyani | jo ba rahe tyachya dhyanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कोण होईल आत्मज्ञानी । जो बा राहे त्याच्या ध्यानीं ॥१॥ मज तो चरणांची आवडी । जन्मोजन्मीं मी न सोडी ॥२॥ होईल सिद्धीचा साधक । त्यासी देई स्वर्गसुखा ॥३॥ कोण होईल देहातीत । त्यासी करी संगरहित ॥४॥ नामा म्हणे जीवें साठीं । तुज मज जन्में पडिली गांठी ॥५॥