भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे

kiti deva tula yaven kakulati | kay ya sanchitin lihilen ase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे ॥१॥ केली कांहो सांडी माझी ह्रषिकेशी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥२॥ ब्रीदाचा तोडर गर्जे त्रिभुवनीं । तूंचि एक धनी त्रैलोक्याचा ॥३॥ समूळ घेतला पृथ्वीचा भारा । माझाचि जोजार काय तुला ॥४॥ नको पाहूं अंत पांडुरंगे आई । नामा विठोपायीं मिठी घाली ॥५॥