भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनाच्या सुर्खे होतो देव । कोण तें वैभव वाणी आतां

kirtanachya surkhe hoto dev | kon ten vaibhav vani atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कीर्तनाच्या सुर्खे होतो देव । कोण तें वैभव वाणी आतां ॥१॥ अंत्यज आणि जातिवंता । मुखीं नाम घेतां उडी घाली ॥२॥ बैसोनी आसनीं आळवितां नाम । उभा सर्वोत्तम तयापुढें ॥३॥ प्रेमाचिया भरें उभ्यानें गर्जत । नाचे हा अनंत तयासवें ॥४॥ नामा म्हणे तया कीर्तनाची गोडी । घालीतसे उडी नेटेपाटें ॥५॥