भजनी मालिका
← भजनांकडे परत

खुंटिने प्रताप कैकईस दाखविला

khuntine pratap kaikais dakhavila

रचनाकार: संत संताजी · अभंग
खुंटिने प्रताप कैकईस दाखविला । वनवासा राम गेला गादी दिली भरताला ।।१।। भरतानी त्याग केला पादुकास मान दिला । दुःखते होतसे कैकईच्या जिवाला ।।२।। संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुंटी । केली तुटा तुटी मायलेका ।।३।।