भजनी मालिका
← भजनांकडे परत

खवळलों आतां न भिये रे तुज । सांडिली रे लाज लौकिकाची

khavalalon atan na bhiye re tuj | sandili re laj laukikachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
खवळलों आतां न भिये रे तुज । सांडिली रे लाज लौकिकाची ॥१॥ आम्ही दीन सिंपे यातिचे ते हीन । दे माझें ठेवणें केशीराजा ॥२॥ साठ लक्ष संख्या चौर्‍यांसी कोटि । त्यांत मी कवडी सोडूं काय ॥३॥ आणिक याहून असेल वेगळें । घेईन तें बळें जाण आतां ॥४॥ तुझें थोरपण ऐक हें देवा । दुर्बळाचा ठेवा अभिलाषी ॥५॥ म्हणूनि पोरटा नामा खेचराचा । काया मनें वाचा सत्य करी ॥६॥