भजनी मालिका
← भजनांकडे परत

खवळलें आतां न भियेंरे तुज । सांडियेली लाज लौकिकाची

khavalalen atan na bhiyenre tuj | sandiyeli laj laukikachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
खवळलें आतां न भियेंरे तुज । सांडियेली लाज लौकिकाची ॥१॥ आम्हीं दीन सिंपे यातीचे हो हीन । दे माझें ठेवणें केशाराजा ॥२॥ साठी लक्ष चौर्‍याण्णव कोडी । त्यांतून एक कवडी न सोडीं मी ॥३॥ आणिक याहुनी असेल आगळें । तें घेईन बळें न सोडीं तुज ॥४॥ तुज थोरपण काईगा हें देवा । आम्हां दुर्बळाच ठेवा अभिलाषसी ॥५॥ पोरटीं म्हणोनी अभिलाष करिसी । ते कोठें निस्तरिसी म्हणे विठा ॥६॥