भजनी मालिका
← भजनांकडे परत

खांदीऋषि तो चालिला । बळीनें द्वारपाळ केला

khandirushi to chalila | balinen dvarapal kela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
खांदीऋषि तो चालिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥ ऐसा भक्ता आधिन होसी । त्याच्या वचनें वर्तसी ॥२॥ कष्टी होतां अंबऋषी । त्याचे गर्भवास सोसी ॥३॥ सर्व दु:खासी साहिलें । जनी म्हणे दळण केलें ॥४॥