भजनी मालिका
← भजनांकडे परत

खगावरी स्वारी करूनियां देवा । धांवसी केशवा भक्तांसाठीं

khagavari svari karuniyan deva | dhanvasi keshava bhaktansathin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
खगावरी स्वारी करूनियां देवा । धांवसी केशवा भक्तांसाठीं ॥१॥ रामा परशुरामा कृष्णा नारायणा । हरी संकर्षणा भक्तांसाठी ॥२॥ बिभीषण तारी रावणासी मारी । दावी भाव हरी भक्तांसाठीं ॥३॥ नामा ह्मणे भक्तांकारणेम गोविंदा । घेवोनियां गदा उभा ठायी ॥४॥