भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला नमस्कार मातेला उठोनी । निघाला तेथुनी लागवेगें

kela namaskar matela uthoni | nighala tethuni lagavegen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केला नमस्कार मातेला उठोनी । निघाला तेथुनी लागवेगें ॥१॥ वनीं बैसोनियां धरोनी विश्वास । आळवावा ईश ऐसें चित्तीं ॥२॥ हाक मारीत मागें माउली चालली । तियेसवें बोली करीना ते ॥३॥ एकाकी तो नीट चालीला त्वरेनें । पाहोंनियां जन स्तब्ध झाले ॥४॥ बोलवितां कांहीं बोलेना कोणासी । अघोर स्थळासी प्रवेशला ॥५॥ मातेसी ठाउकें तयाचें अंतर । म्हणोनी ते स्थिर झाली ठाईं ॥६॥ नामा म्हणे पूर्व पुण्याचिया बळें । मन त्याचें झालें स्थीर तेथें ॥७॥