भजनी मालिका
← भजनांकडे परत

काया कर पैं फुटों नेदी । टाळ विंडी वाहिन खांदीं

kaya kar pain phuton nedi | tal vindi vahin khandin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काया कर पैं फुटों नेदी । टाळ विंडी वाहिन खांदीं ॥१॥ तूं बा माझा तूं बा माझा । तूं बा माझा केशिराजा ॥२॥ आळवणीच तूं बा वाचे । तेणें छंदें पेंधा नाचे ॥३॥ तूं बा माझा मी दास तुझा । विनवितो नामा केशिराजा ॥४॥