भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय वहिनीनें दिधलें आम्हांसी । दाखवा वेगेसी कृष्ण म्हणे

kay vahininen didhalen amhansi | dakhava vegesi krushna mhane

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय वहिनीनें दिधलें आम्हांसी । दाखवा वेगेसी कृष्ण म्हणे ॥१॥ सोडियेली तेव्हां मुष्टी तंदुळिका । रुक्मीणीनाइका पुढें ठेवी ॥२॥ घेऊनि ते पोहे मुखामाजी टाकी । मागे ते भीमकी धरोनी हात ॥३॥ ब्रम्हदिक देव उभे पोह्यांसाठीं । नाहीं त्या लल्लाटीं नामा म्हणे ॥४॥