भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तुज देवा आलें थोरपण । दाविसी कृपण उणें पुरें

kay tuj deva alen thorapan | davisi krupan unen puren

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय तुज देवा आलें थोरपण । दाविसी कृपण उणें पुरें ॥१॥ पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी । गोकुळाभीतरीम खेळ मांडी ॥२॥ हलाहल शांत करी तत्क्षण । अमृतजीवन नाम तुझें ॥३॥ तुझें नाम सर्व सदा गोपाळासी । नामा म्हणे यासी काय जालें ॥४॥