भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय थोरपणा मिरविसी व्यर्था । खोटेपणा स्वार्थ कळों

kay thorapana miravisi vyartha | khotepana svartha kalon

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय थोरपणा मिरविसी व्यर्था । खोटेपणा स्वार्थ कळों ॥१॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ । वचन यथार्थ बोल आतां ॥२॥ होसी कालिमाजीं कलिसारिखाची । भोळया भाविकाच्या भक्तिकाजा ॥३॥ नामा म्हणे माळ घातिली स्वहस्तें । करितोसि दंडवत निमित्यासी ॥४॥