भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय सांगों कर्मभोग । पातलिंग शिवाचें

kay sangon karmabhog | pataling shivachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय सांगों कर्मभोग । पातलिंग शिवाचें ॥१॥ याच सुखें ब्रह्मामुख । उभा नख छेदिला ॥२॥ सुचिष्मत पंडुपुत्र । भिक्षा पात्र हिंडती ॥३॥ नामा ह्मणे कर्मरेखा । देवांदिकां चुकेना ॥४॥