भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय पुण्य केलें इहीं जीवा जनीं । पंढरी नयनीं देखि-येली

kay punya kelen ihin jiva janin | pandhari nayanin dekhi-yeli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय पुण्य केलें इहीं जीवा जनीं । पंढरी नयनीं देखि-येली ॥१॥ अनंता जन्मांचे होंचि प्रायश्चित । वाचे जपे नित्य राम नाम ॥२॥ कोटी कुळें केलीं क्षणेंचि पावन । केल्या एक स्नान चंद्रभागे ॥३॥ शोक मोह ताप विध्वंसिल हेळां । अवलोकितां डोळां पांडुरंग ॥४॥ महा पापराशी तिहीं केल्या होळी । वाजवि-ल्या टाळी विठ्ठलनाम ॥५॥ नामा म्हणे धन्य धन्य ते संसारीं । चालविती वारी पंढरीची ॥६॥