भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं या कर्मासी । धांव पाव ह्रषिकेशी

kay karun ya karmasi | dhanv pav hrashikeshi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय करूं या कर्मासी । धांव पाव ह्रषिकेशी ॥१॥ नाश होतो आयुष्याचा । तुझें नांव नये वाचा ॥२॥ काय जिणें या देहाचें । अखंड अवघ्या रात्रीचें ॥३॥ व्यर्थ कष्टविली माता । तुझें नाम नये गातां ॥४॥ जन्म मरणाचें दु:ख । म्हणे जनीदाखवीं मुख ॥५॥