भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं पंढरीनाथा । काळ साह्य नाहीं आतां

kay karun pandharinatha | kal sahya nahin atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय करूं पंढरीनाथा । काळ साह्य नाहीं आतां ॥१॥ मज टाकिलें परदेशीं । नारा विठा तुजपाशीं ॥२॥ श्रम बहु झाला जीवा । आतां सांभाळीं केशवा ॥३॥