भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय कामा पुत्र कोणा आले जाणा । शेखीं त्या रावणा काय झालें

kay kama putra kona ale jana | shekhin tya ravana kay jhalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय कामा पुत्र कोणा आले जाणा । शेखीं त्या रावणा काय झालें ॥१॥ महादुष्टें शंखासुरें नेले वेद । शेवटीं गोविंदें सोडविले ॥२॥ पितयाचे हातें पुत्र वध केला । केशव सांवळा नामा ह्मणे ॥३॥