भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय गाणीव काय जाणीव । काय शहाणीव कीर्तनाची

kay ganiv kay janiv | kay shahaniv kirtanachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय गाणीव काय जाणीव । काय शहाणीव कीर्तनाची ॥१॥ थाक तोडिलें डोळे मोडिले । लोकां मानवलें बरें गातो ॥२॥ हरिचें नाम तूं नेणसी । वांयां कीर्तनीं उभा ठाकसी ॥३॥ हरीचें नाम तुम्ही गारे प्रेमें । विठा म्हणे माझ्या बापाच्या नांवें ॥४॥