भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय देशील यांजला । ब्रह्मा म्हणे न कळे मला

kay deshil yanjala | brahma mhane na kale mala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय देशील यांजला । ब्रह्मा म्हणे न कळे मला ॥१॥ म्हणसी देईन मी मुक्ति । तरी ऐक रमापति ॥२॥ मारायासी आले । त्यांसी स्वरूपीं मिळविलें ॥३॥ येथोनियां नवजासी । मज कळलें मानसीं ॥४॥ आणोनियां देत । गायी गोपाळ समस्त ॥५॥ घाली पोटामध्यें डोई । क्षमा करीं माझे आई ॥६॥ आज्ञा घेवोनियां येला । नामा म्हणे स्वस्थ झाला ॥७॥