भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय आम्हापाशीं आहे धन वित्त । दान तें उचित देऊं काय

kay amhapashin ahe dhan vitta | dan ten uchit deun kay

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय आम्हापाशीं आहे धन वित्त । दान तें उचित देऊं काय ॥१॥ देतां घेतां आम्हां पुरे पुरे जालें । संगतीं त्यागिलें भिवोनियां ॥२॥ काय वाणूं गुण भिकरपणाची । होसी पंढरीची नामनौका ॥३॥ नामा म्हणे पुढें दाखवी मारग । आम्ही तुज मागें येऊं सुखें ॥४॥