भजनी मालिका
← भजनांकडे परत

कटीं कर उभा ऐसा । पहा कैसा घरघेणा

katin kar ubha aisa | paha kaisa gharaghena

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कटीं कर उभा ऐसा । पहा कैसा घरघेणा ॥१॥ माझा हिशेव करी हिशेव करी । हिशेब करी केशवा ॥२॥ चौर्‍याशीं लक्ष जन्म केली तुझी सेवा । माझें ठेवणें देईअ गा दिवा ॥३॥ नामा म्हणे मज खवळिसी वायां । पिसाळलों तरी झोंबेन तुझ्या पायां ॥४॥