भजनी मालिका
← भजनांकडे परत

कस्तुरीचा टिळा रेखिला कपाळीं । तेणें ते शोभली मूर्ति बरी

kasturicha tila rekhila kapalin | tenen te shobhali murti bari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कस्तुरीचा टिळा रेखिला कपाळीं । तेणें ते शोभली मूर्ति बरी ॥१॥ बरवा बरवा विठ्ठल गे बाई । वर्णावया साही शिनताती ॥२॥ श्रीवत्सलांच्छन वैजयंती गळां । नेसला पाटोळा तेजःपुंज ॥३॥ पाऊलें समान विटेवरी नीट । नामा म्हणे भेट घ्यावी त्याची ॥४॥