भजनी मालिका
← भजनांकडे परत

कस्तुरी कुंकुम रेखे लाल टिळा । केशराची उटि सर्वां-मासी

kasturi kunkum rekhe lal tila | kesharachi uti sarvan-masi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कस्तुरी कुंकुम रेखे लाल टिळा । केशराची उटि सर्वां-मासी ॥१॥ पाहिला पाहिला माझा पांडुरंग । जीवीं जिवलग डोळे भरी ॥२॥ हार शोभे गळां मंजुरी़चा तुरा । कर्ण रत्न फळा झळाळित ॥३॥ विटेवरी नीट गोमटीं पाउलें । त्यांवरी ठेविलें मस्तक म्यां ॥४॥ नामयाची धणी भुकेली ते धाली । आनंद दि-वाळी आजि झाली ॥५॥