भजनी मालिका
← भजनांकडे परत

काशीराजक्षेत्रीं जुंपिलें आउत । अष्ट धान्यें तेथें पेरि-येलीं

kashirajakshetrin jumpilen aut | ashta dhanyen tethen peri-yelin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काशीराजक्षेत्रीं जुंपिलें आउत । अष्ट धान्यें तेथें पेरि-येलीं ॥१॥ मेघ:श्यामघोष वर्षे सर्वांधारी । बींज विटेवरी सासि-न्नलें ॥२॥ जगाचें जीवन पंढरी पिकली । चारया सोकली भूतजातें ॥३॥ घालूनियां माळा रक्षी कळिकाळा । नि विटों विठ्ठला संसारासी ॥४॥ पाप सोकरण भक्ति हें गोफण । भूस कांडी कण नाम घायीं ॥५॥ वेद स्मृति श्रुति ऐसें बोलवितां । गूढ वेगळितां लाभ होती ॥६॥ नामा म्हणे स्वामि केशव सूकाळ । अन्नब्रह्म फळ नाम बीज ॥७॥