भजनी मालिका
← भजनांकडे परत

काशी हे पंढरी । प्रयाग नीरा नृसिंहपुरी । पिंड ठेवा पुष्पवती संगमपदावरी । पूर्वज होती चतुर्भुज

kashi he pandhari | prayag nira nrusinhapuri | pind theva pushpavati sangamapadavari | purvaj hoti chaturbhuj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काशी हे पंढरी । प्रयाग नीरा नृसिंहपुरी । पिंड ठेवा पुष्पवती संगमपदावरी । पूर्वज होती चतुर्भुज ॥१॥ सकळ तीर्थें वाराणसी । मध्यनकाळीं येती पंढरीसी । ओंवाळिती विठोबासी । विश्वनाथ ह्मणोनियां ॥२॥ ह्मणऊनि वेगीं चला पंढरपुरा । विठोबा-रायाच्या नगरा । चंद्रभागा सरोवरा । देव कौतुक पाहती ॥३॥ वारा-पासी मनिकर्णिका । चंद्रभागा पुंडलिका । वाराणसी भागीरथी देखा । पांडुरंगीं भीमरथी ॥४॥ वाराणसी पंचगंगा । पुष्पवती पांडुरंगा । महा पातकें जाती भंगा । तीर्थें मस्तकीं वंदिल्या ॥५॥ वाराणसी दंडपाणि । क्षेत्रपाळ हे हनुमंत दोन्ही । सकळ तीर्थें विठोबाचे चरणीं । काशी होय पंढरी ॥६॥ वारासणसी माधवबिंदू । पांडुरंगीं वेणुनादू । पंचकोशी तीर्थ उदंडू । पांडुरंगी पद्मतीर्थ ॥७॥ वारा-णसी मोक्षपंथा । विठठलचेनि सायुज्यता । एवढें तीर्थ त्रिभुवनीं पा-हतां । तीर्थ नाहीं यापरतें ॥८॥ वाराणसी चंद्रमौळी । पांडुरंगीं वनमाळी । विश्र्वनाथ नंदी जवळी । विठोबा जवळी गरुड असे ॥९॥ वाराणसी गौरी खुणा । पांडुरंगीं रुक्मिणी जाणा । वाराणसी अन्न-पूर्णा । पांडुरंगीं जाणा सत्यभामा ॥१०॥ वाराणसी त्रिशुळावरी । सुदर्शनावरी पंढरी । कांहीं संदेह मनीं न धरीं । काशी होय पंढरी ॥११॥ ऐसें सकळ तीर्थांचें माहेर । तीर्थ नाहीं यापरतें थोर । विष्णुदास नामयाचा दातार । पुंडलिकासहित असे ॥१२॥