भजनी मालिका
← भजनांकडे परत

करिताम हे वेदाध्ययन ज्योतिष । नामाचा तो लेश न ये हातां

karitam he vedadhyayan jyotish | namacha to lesh na ye hatan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करिताम हे वेदाध्ययन ज्योतिष । नामाचा तो लेश न ये हातां ॥१॥ बहुत व्युत्पत्ति सांगति पुराण । व्यर्थ तें स्मरण नाम नव्हे ॥२॥ अनंत हें नाम जयांतुनि आलें । त्यांतचि विरालें जळीं जळ ॥३॥ तें नाम सद्‌गुरुकृपेविण कोणा । साधिताम साधेना जपें तपें ॥४॥ नामदेव म्हणे स्वतःसिद्ध नाम । गुरुविण वर्म हाताम न ये ॥५॥