भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर जोडोनियां पुढें । लोटांगण टाकिलें गाढें

kar jodoniyan pudhen | lotangan takilen gadhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कर जोडोनियां पुढें । लोटांगण टाकिलें गाढें । म्हणे स्तवन करावया मी वेडें । काय जाणे तुझा महिमा ॥१॥ तरी पांडुरंगा तूं दयाळु । भक्त भाविकां कृपाळु । भीमातटीं उभा गोपाळु । पुंडलिकाकरणें ॥२॥ चंद्रभागा सरोवरीं । निरे भिवरेचां तिरिं । वाट पाहसी हरी । भक्तासाह्या कारणें ॥३॥ तरी उदार शूर महिमेचा । खुंटलिया चारी वाचा । तेथ पवाडु मज कैंचा । वर्णाविया सामर्थ्य ॥४॥ शेषा ऐसा स्तुती करी । तया नाकळ्सीच श्राहरि । जिव्हा चिरलिया भग्नधारी । मग मौन्येंचि राहिला ॥५॥ तो तूं अळंकापुरीं येसी । मज दीना समोखिसि । देव म्हणे तूं होसि । साक्षात ज्ञानरुप ॥६॥ ज्ञानदेवो साक्षात नाम तुझें । तें ज्ञान ह्रदयीचें माझें । हे जन तारावया काजें । तुवां अवतार घेतला ॥७॥ नामा म्हणे देव हरी । पुढतोपुढतीं साहाकारी । वर देऊनि अंगिकारी । आपणची जाला ॥८॥