भजनी मालिका
← भजनांकडे परत

कपटनाटका कल्लोळ करुणा । मजलागीं दीन होसी देवा

kapatanataka kallol karuna | majalagin din hosi deva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कपटनाटका कल्लोळ करुणा । मजलागीं दीन होसी देवा ॥१॥ रात्रंदिवस मज ठेवुनि जवळ । घालसी कवळ मुखामाजीं ॥२॥ पेंद्या सुदाम्याचे करिसी कैवार । मजसी अंतर केलें आतां ॥३॥ नामा म्हणे आम्हीं करितों बोभाट । देऊं नको भेट पांडुरंगा ॥४॥