भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांचीपुरीं राजा नामें सोमदत्ती । तयाचे संपत्ती पार नाहीं

kanchipurin raja namen somadatti | tayache sampatti par nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कांचीपुरीं राजा नामें सोमदत्ती । तयाचे संपत्ती पार नाहीं ॥१॥ पूर्वपुण्यबळें लाधलें तयासी । देतां उपमेसी उणा शक्र ॥२॥ पांचशतें तया कामिनी सुंदरा । करितां नाहीं पुरा झाला काम ॥३॥ रिद्धि सिद्धि घरीं कामारि हिंडती । धैर्य शौर्य कीर्ति ज्याची जगीं ॥४॥ नामा म्हणे जेथें उणें कांही नाहीं । ऐसें असो-निही न सुटे भोग ॥५॥