भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गा केशिराजा मोकलीलें मातें । शरण मी कोणातें जाऊं आतां

kan ga keshiraja mokalilen maten | sharan mi konaten jaun atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कां गा केशिराजा मोकलीलें मातें । शरण मी कोणातें जाऊं आतां ॥१॥ तुजविण मज न दिसे निर्वाणीं । मायबाप धणी गणगोत ॥२॥ आतां माझी लाज राखें पंढरीनाथा । तुजविण अनंता आणिक नाहीं ॥३॥ अनाथांचा नाथ दीनांचा कैवारी । पाव झडकरी आपुल्या दासा ॥४॥ गोरियाचे हात आलेचि तत्क्षणीं । नामा कीर्ति वर्णीं विठोबाची ॥५॥