भजनी मालिका
← भजनांकडे परत

कमळगर्भा मनीं थोर चिंता करी । पद्म ठसेवरी उम-टताती

kamalagarbha manin thor chinta kari | padma thasevari um-tatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कमळगर्भा मनीं थोर चिंता करी । पद्म ठसेवरी उम-टताती ॥१॥ नीलोत्पल जैसें चरण वानूं कैसे । सकुमार राजस विठ्ठ-लाचे ॥२॥ लावण्यसागरु रूप पाहों ठेली । दृष्टी पैं खुंटली रुक्मिणीची ॥३॥ नामा ह्मणे विठोचे चरण सकुमार । तेथें वाहे धार गंगादेवी ॥४॥