भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळा गे दादुला पाहतां आकळू । तो झाला गोवळू नंदाचा

kala ge dadula pahatan akalu | to jhala govalu nandacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काळा गे दादुला पाहतां आकळू । तो झाला गोवळू नंदाचा ॥१॥ काळागे दादुला काळागे दादुला । पंढरीं पहा चला विठ्ठलगे ॥२॥ काळा ह्मणोनी पाहों गेलों जवळां । सुनीळू सांवळा दिसतसे ॥३॥ नामा ह्मणे सर्व भक्षितो हा काळू । भक्तांचा कृपाळू श्रीविठ्ठल ॥४॥