भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पति योगिराज

kailasincha dev bhola chakravarti | parvaticha pati yogiraj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पति योगिराज ॥१॥ तयाचिया पाया माझे दंडवत । घडो आणि प्रीत जडो नामीं ॥२॥ जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळीं । तिजा नेत्रज्वाळी जात वेद ॥३॥ कंठीं काळकूट डौर त्रिशूल हातीं । सर्वांगीं विभूति शोभतसे ॥४॥ गळां रुंडमाळा खापर हस्तकीं । रामनाम मुखीं सर्व-काळ ॥५॥ व्याघ्रचर्मधारी स्मशानीं राहिला । संगें भूतमेळा बिरा-जित ॥६॥ नामा ह्मणे नामें नासोनियां पाप । करीं मुखरूप भक्तांलागीं ॥७॥