भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैलासासा वास अधिक सिद्धबेट । विष्णूचें वैकुंठ पुरातन

kailasasa vas adhik siddhabet | vishnuchen vaikunth puratan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कैलासासा वास अधिक सिद्धबेट । विष्णूचें वैकुंठ पुरातन ॥१॥ भूमीवरी पंढरी तैसी आळंकापुरी । पंच कोशावरी पुण्यभूमी ॥२॥ सुखाची हे मूर्ति नीलकंठलिंग । चक्रतीर्थ सांग मोक्ष भेटे ॥३॥ परमार्थ सुअर्थ देखतांची संत । सांगितली मात अनुभवाची ॥४॥ नामा म्हणे देवा हें स्थळ चांगलें । चित्त मन रंगलें ज्ञानोबाचें ॥५॥