भजनी मालिका
← भजनांकडे परत

कडू वृंदावन साखरें घोळिलें । तरी काय गेलें कडू-पण

kadu vrundavan sakharen gholilen | tari kay gelen kadu-pan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कडू वृंदावन साखरें घोळिलें । तरी काय गेलें कडू-पण ॥१॥ तैसा तो अधम करो तीर्थाटण । नोहे त्याचें मन निर्मळत्व ॥२॥ बचनाग रवा दुग्धीं शिजविला । तरी काय गेलेआ त्याचा गुण ॥३॥ नामा म्हणे संत सज्जन संगतीं । ऐशासही गति कळांतरीं ॥४॥