भजनी मालिका
← भजनांकडे परत

काढीतसे दृष्टी संदपिनपत्नी । न वर्णवे वाणी हर्षं तिचा

kadhitase drushti sandapinapatni | na varnave vani harshan ticha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काढीतसे दृष्टी संदपिनपत्नी । न वर्णवे वाणी हर्षं तिचा ॥१॥ असे कांहीं इच्छा मागावें आणीक । दिल्हें हें बाळक ह्मणती दोघे ॥२॥ अहर्निशीं तुझ्यां असावें कल्याण । आले रामकृष्ण मथुरेसी ॥३॥ कृतांतासी धाक नामा ह्मणे त्याचा । आहें मी तयाचा शरणागत ॥४॥