भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यासी नावडे पंढरी । तोचि वसेल अघोरीं

jyasi navade pandhari | tochi vasel aghorin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्यासी नावडे पंढरी । तोचि वसेल अघोरीं ॥१॥ त्यासी जाची यमदूत । सकळ पूर्वजांसहित ॥२॥ जया नावडे हरिनाम । तया कुंभपाकीं धाम ॥३॥ जया नावडती संत । ते चालती यमपंथ ॥४॥ जया नावडे भीमरथी । तेचि अघोरीं पचती ॥५॥ या बोलाचा धरीं विश्वास । विठा म्हणे विष्णुदास ॥६॥