भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यालागीं जोडिसी ते न येती तुजसरसीं । यम कासाविसी करी तये वेळां

jyalagin jodisi te na yeti tujasarasin | yam kasavisi kari taye velan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्यालागीं जोडिसी ते न येती तुजसरसीं । यम कासाविसी करी तये वेळां ॥१॥ तूं तरी अज्ञान न देखसी डोळा । झालसि गोठोळा धनगरांसी ॥२॥ चिरीरी घेतो सांपडलिया हातीं । अवधी त्याची पळती टाकोनियां ॥३॥ संतीं न म्हणावें वचन निषुर । वेगीं ठाका द्बार केशवाचें ॥४॥ नामा म्हणे शरन रिघा हरि पायीं । तया शेषशायी न विसंबे ॥५॥