भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचिया रे मनें देखियेलें तुज । त्याची लोकलाज मावळली

jyachiya re manen dekhiyelen tuj | tyachi lokalaj mavalali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्याचिया रे मनें देखियेलें तुज । त्याची लोकलाज मावळली ॥१॥ नाहीं तया क्रिया नाहीं तया कर्म । नाहीं वर्णाश्रम सुखदुःख ॥२॥ नाहीं देह स्फूर्ति जाती कुळ भेद । अखंडा आनंद ऐक्यतेचा ॥३॥ नामा म्हणे त्याचे चरणरज व्हावें । हेंचि भाग्य द्यावें केशिराजा ॥४॥