भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचें दैव त्या सांगातें । मला नवल वाटतें

jyachen daiv tya sangaten | mala naval vataten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्याचें दैव त्या सांगातें । मला नवल वाटतें ॥१॥ एक बैसती अश्वावरी । एक चालती चरणचाली ॥२॥ एक जेविती मिष्टान्न । एका न मिळे कोरान्न ॥३॥ गोणाई म्हणे धन्य देवा । नामयाचा संचित ठेवा ॥४॥