भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवींचे गुजगौप्य सांगेन वो तूतें । ऐक एकचित्तें मनोधर्मे

jivinche gujagaupya sangen vo tuten | aik ekachitten manodharme

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जीवींचे गुजगौप्य सांगेन वो तूतें । ऐक एकचित्तें मनोधर्मे ॥१॥ आवडते हे माझे भक्त परम सखे । जे सबाह्य सारिखे सप्रेमळ ॥२॥ त्यापरिस थोर नाहीं मन दुजें । मज त्याचेनि काजें नांवरुप ॥३॥ भक्त सर्वांहोनि पढियंते माझिया हो जीवा । भक्त हा विसावा ज्ञानियांचा ॥४॥ भक्त योगियांच्या सुखाचा श्रृंगारु । भक्त अलंकारु वैराग्याचा ॥५॥ भक्त वो माझिया जीवीचें निजध्येय । भक्त परमप्रिय कुळदैवत ॥६॥ भक्तसंर्गेसुर्खें विश्रांति विसांवा । भक्त माझा ठेवा सर्व धन ॥७॥ भक्त हे माझिया भाग्याचें भूषण । भक्त ते निधान निक्षेपीचें ॥८॥ भक्त यश कीर्ति भक्त सुख मूर्ति । भेटे तरी पुरती सकळ काम ॥९॥ भक्त माझ्या सर्व सुखाचा अधिकारी । भक्तचिया घरीं वस्ती माझी ॥१०॥ मज आणि भक्तां नाहीं वेगळिक । घ्य्वावें सर्व सुख भक्तें माझें ॥११॥ भक्तें नाम घ्यावें भक्तें रुप घ्यावें । भक्तें मुख पहावें घडिये घडिये ॥१२॥ भक्तें नाम घ्यावें भक्तें रुप घ्यावें । भक्तें आलिंगन द्यावें मज ॥१३॥ धर्मअर्थकाममोक्ष मुक्ति चारी । देतां न धरी करीं भक्त माझा ॥१४॥ भक्त न मागे कांहीं न घाली मज भार । मजहुनि उदार भक्त माझा ॥१५॥ पत्रपुष्प फळ जळ तें सर्वभावें । भक्तांचे मज व्हावें भलतैसें ॥१६॥ आस करुनी वास पाहे घडिये घडिये । भक्ताचें तें पढिये सर्व मज ॥१७॥ तरी मी भक्तांचा कीं भक्त आमुचे । सोईर निजाचे एकमेक ॥१८॥ म्हणोनि नामयाचे आर्त थोर जीवा । जवळोनि जवजावा दूर कोठे ॥१९॥