भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिव्हे केशवाचें करितां कीर्तन । मिथ्या वदूं नको एक रामाविण

jivhe keshavachen karitan kirtan | mithya vadun nako ek ramavin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जिव्हे केशवाचें करितां कीर्तन । मिथ्या वदूं नको एक रामाविण ॥१॥ म्हणऊनि हरिरंगीं रंगा । नाम घेतां महा पातकें जाती भंगा ॥२॥ चित्तीं चिंतितां होई तद्रूप । मिथ्या विषयीं लुब्ध झालिया काय सुख ॥३॥ पूजन करा तुह्मी अच्युताचें । नामा ह्मणे एकचित्तें साचें ॥४॥