भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल । परमात्मा विठठल विठ्ठल

jiv viththal atma viththal | paramatma vithathal viththal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल । परमात्मा विठठल विठ्ठल ॥१॥ जनक विठ्ठल जननी विठ्ठल । सोयरा विठ्ठल सांगाती ॥२॥ अहिक्य विठ्ठल परत्र विठ्ठल । निरंतर विठ्ठल तारीता ॥३॥ नाम विठ्ठल रूप विठ्ठल । पति पावन विठ्ठल विठ्ठल नामा ॥४॥