भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीव शिव ग्रामी मीतूंपण पाही । हा गौरव कांहीं नाहीं नामीं

jiv shiv grami mitumpan pahi | ha gaurav kanhin nahin namin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जीव शिव ग्रामी मीतूंपण पाही । हा गौरव कांहीं नाहीं नामीं ॥१॥ नाहीं चतुर्देह तूर्या हे उन्मनी । स्वयंभु ते खाणी निजनामाची ॥२॥ नामीं जडे चित्त तेथें काय उणें । लज्जित साधनें नाना जहालीं ॥३॥ नामदेव म्हणे मीतूंपण नाहीं । नाहीं आन कांहीं सर्व तेंची ॥४॥