भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेवी जेवीं बा मुरारी । तुज वाढिली शिदोरी

jevi jevin ba murari | tuj vadhili shidori

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जेवी जेवीं बा मुरारी । तुज वाढिली शिदोरी ॥१॥ कनकाचे ताटीं । रत्नजडित ठेविली वाटी ॥२॥ आमुचें ब्रम्हा सारंगपाणी । हिंडतसे रानोरानीं ॥३॥ गोपाळांचे मेळीं । हरि खेळे चेंडू फळी ॥४॥ तुळसीचे वनीं । उभी राहे दासी जनी ॥५॥