भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचें दरुषण होतांची दुरुनी । सर्व जाये पळोनी पाप ताप

jayachen darushan hotanchi duruni | sarva jaye paloni pap tap

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जयाचें दरुषण होतांची दुरुनी । सर्व जाये पळोनी पाप ताप ॥१॥ तीर्थासी पावन कलिमलछेदन । देवाचें कल्याण जयाचेंनी ॥२॥ ते पाय सादृश्य देखिले आजि दृष्टी । याग सहस्त्र कोटी न तुकती ॥३॥ जयांच्या ह्रदयीं वेदांचा निवास । शास्त्रें रहिवास केला होय ॥४॥ जयांच्या वचनें देवपितर तृप्त । स्वाहा स्वधा होत ज्यांच्या मुखें ॥५॥ जोडोनियां कर विनवितो सोपान । निश्चयें वचन द्यावें आम्हां ॥६॥ शेष उच्छिष्टा करावेम विभागी । बटुपणालागी अधिकारी ॥७॥ अध्यात्मग्रंथ पाहती पैठणीं । गीतासंबोधिनी जवळी असे ॥८॥ भोगावतीं स्नान कालिका दरुषण । वेदांत व्याख्यान परिमिती ॥९॥ धन्य हा सोपान धन्य ज्ञानदेव । धन्य निवृत्तिराय ब्रह्मरुप ॥१०॥ सांगती पुराण रात्रीं हरिकीर्तन । पैठणींचे जन वेधियेले ॥११॥ तव कव्ययज्ञ जाला गृहस्थाचे घरीं । पितर मंत्रोच्चारीं आव्हानिले ॥१२॥ अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य । यासारिखे ब्राह्मण नाहीं कोणी ॥१३॥ उपनिष‌दभाग पढिन्नलों वेदांत । परि हें सामर्थ्य नाहीं आम्हां ॥१४॥ नाहीं ऐकिलें ना कोठें वर्तलें । सृष्टी तेंचि आजि दृष्टीं दाखविले ॥१५॥ पशुमुर्खे वेद दृश्य इतर लोक । थोर हें कवतुक दाखविलें ॥१६॥ मिळोनि समस्त सोडियेलें शास्त्र । विचारोनी पत्र लिहियेलें ॥१७॥ हें परलोकीचें तारु देवत्रय कोणी । प्रायश्चित्त काय द्यावें कोणी ॥१८॥ लिहोनियां पत्र दिधलें तया हातीं । सम्स्तांसी निवृत्ति नमस्कारिलें ॥१९॥