भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचे उदरीं जन्मला नर । पिडी तया थोर सर्वकाळ

jayache udarin janmala nar | pidi taya thor sarvakal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जयाचे उदरीं जन्मला नर । पिडी तया थोर सर्वकाळ ॥१॥ मानिली अंतरीं सखी जीवनलग । आत्महत्या मग घात करी ॥२॥ मानीना तो भक्ति भ्रष्ट आचरण । दोषी नारायण सदोदित ॥३॥ नामा म्हने ऐसे पातकी चांडाळ । बुडविलें कुळ बेचाळिस ॥४॥